"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

दाभेरी   हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक डोंगराळ भागातील   गाव आहे. दाभेरी  गावात गावदेवी  मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २३६६  आहे. ग्रामपंचायत मधील गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3, अंगणवाडी केंद्रे ६, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ती हंगामी शेती असुन खरीप हंगामातील भात,नागली,वरी, तुर,उडीद,खुरसणी,कुळीद ही प्रमुख पिके घेतली जातात. भात आणि आंबा, काजु या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते, तसेच दुग्ध व्यवसाय करतात

2.   दाभेरी  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दाभेरी  गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

2. भौगोलिक स्थान

दाभेरी  हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ३५  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ८५८.७२ हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ७६६  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या २३६६  आहे. त्यामध्ये १२४६  पुरुष  ११२० महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने चढ उतार प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे. तसेच हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी २३०० मीमी पर्जन्यवृष्टी होते.

3. लोकजीवन

दाभेरी  गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात,नागली,वरी, तुर,उडीद,खुरसणी,कुळीद व हंगामी आंबा, काजु  पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. मखर,माउली,साथी असे आदिवासी सन तसेच हिंदु सन गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

खडखड च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

5. संस्कृती परंपरा

दाभेरी   गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावात वर्षा दिवाळी अगोदर माउली तसेच भात कापणी नंतर साथी हे सन महत्वाचे असुन या सणांना गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

 . जवळची गावे

दाभेरी  गाव जव्हार तालुक्यातील शेवटच्या  ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे दाभेरी  गावासी  सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.खेडपा कायरी रुइघर हि गावे आहेत

ग्रामपंचायत प्रशासन

अ क्र

नाव

पद

मोबाईल न

सौ – प्रमिला धावजी वाजे

लोकनियुक्त सरपंच

7378797217

श्री – सनी सावळाराम कडाळी

उपसरपंच

9673874537

श्री – धावजी गोपाळ वाजे

सदस्य

8262894271

श्री – अविनाश गणेश सापटे

सदस्य

7020504057

श्रीम- वैशाली नितीन खुताडे

सदस्य

9623946615

श्रीम – प्रियंका सुरज टोकरे

सदस्य

8379855938

श्रीम- अरुणा यशवंत धोंडगा

सदस्य

9579813294

सौ.वैशाली गोविंद खुताडे

सदस्य

7045859573

सौ- बेबी रामा घाटाळ

सदस्य

7624051864

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


840
2366
1246
1120

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo